marriage fraud Pudhari
यवतमाळ

Yavatmal Crime| विवाहाच्या नावाखाली वराला गंडा; वधूसह पाच जणांना अटक

घाटंजी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Yavatmal marriage fraud

यवतमाळ : विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली वर मुलाला गंडा घालणाऱ्या वधूसह पाच जणांना घाटंजी पोलिसांनी अटक केली. यात वधूची आई, भाऊ व इतर दोन साथीदारांचा समावेश आहे. आता या टोळीने इतर ठिकाणी केलेल्या कारनाम्याचाही शोध सुरू आहे.

सिमरन गौतम पाटील (वय २५, रा. चोरंबा, ता. घाटंजी) तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील व साथीदार सुनील राठोड, माणिक पवार (रा. पुसद), अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी 'विवाह जुळवून देणारे' असल्याचे भासवून जाळ्यात ओढत होते. मुलीच्या घरी पाहणीचा कार्यक्रम ठेवून 'घरची आर्थिक परिस्थिती खराब आहे, असे सांगून लग्नाचा सर्व खर्च नवऱ्या मुलाला करावा लागेल, असे सांगितले जात होते. या पद्धतीने त्यांनी अविनाश चांगदेव कवडे (वय ३२, रा. बानगाव, जि. नाशिक) याला फसविले. त्याच्याकडून दोन लाख रुपये उकळले. याप्रकरणी अविनाशच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT