Accident Pudhari
यवतमाळ

Yavatmal Accident | मारेगाव शहरात स्कूल बसच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

मारेगाव पोलिसांत बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Maregaon School Bus Accident

यवतमाळ : भरधाव येणाऱ्या स्कूल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. मारेगाव शहरातील मार्डी चौक ते शासकीय रुग्णालय मार्गावर गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रमेश दादाराव मेश्राम (26, रा. डोंगरगाव) हा मित्राच्या दुचाकीने मारेगावकडे येत असताना पिवळ्या रंगाच्या स्कूल बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात रमेश गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला उपचारासाठी मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला वणी येथे हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि सागर दानडे यांच्या मार्गदर्शनात पोहेका जुनेद शेख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT