Farmer Death Electricity File Photo
यवतमाळ

Yavatmal Electrocution Death : विजेचा धक्का बसल्याने दोन घटनेत दोघांचा मृत्यू

यवतमाळ आणि महागाव तालुक्यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Yavatmal Two Dead Electrocution

यवतमाळ : विजेचा धक्का लागल्याने दोघांचा मृत्यू झाला. पहिली घटना महागाव तालुक्यातील वडद येथे तर दुसरी घटना यवतमाळ तालुक्यातील वडगाव येथे घडली. कृष्णा रमेश गोदमले (२२, रा. वडद), देवराव खुशाल वाघमारे (वय ५५, रा. वडगाव) अशी मृतांची नावे आहेत.

कृष्णा हा शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी शेतशिवारात गेला होता. यावेळी त्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सोबत असलेल्या तीन मित्रांनी गावात येऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.

महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर दुसऱ्या घटनेत घराच्या छपाईचे काम करीत असताना घराजवळून गेलेल्या ११ केव्ही कृषी वाहिनीच्या जिवंत वीज तारेला कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम बॅटमचा स्पर्श झाला.

विजेचा धक्का बसल्याने देवराव वाघमारे छतावरून खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी यवतमाळकडे हलविण्यात आले. मात्र, देवराव वाघमारे यांचा वाटेत मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT