जन्मठेप FIle Photo
यवतमाळ

Yavatmal Crime : मजुरीच्या पैशासाठी हत्या करणाऱ्या घाटंजी येथील आरोपीला जन्मठेप

Yavatmal District Court Verdict | अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.यु, बघेले यांनी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

पुढारी वृत्तसेवा

Ghatanji Life Imprisonment Sentence

यवतमाळ : मजुरीच्या पैशावरून वाद घालत आरोपीने लाकडी दांडक्याने प्रहार करून एकाची हत्या केली. या गुन्ह्यात आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.यु, बघेले यांनी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सचिन वंदन पाटील (वय २६, रा. अंजी, ता. घाटंजी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १३ जानेवारी २०२० रोजी रात्री ९:३० वाजता अरविंद कोहरे यांना घराबाहेर बोलावून वाद घालण्यास सुरुवात केली. आज तुझा हिशोबच करतो, असे म्हणत त्यास घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोहोचले. तेथे सचिनने अरविंद कोहरे यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार करून त्यांची जागेवरच हत्या केली.

हा सर्व घटनाक्रम अरविंदची पत्नी पुनेरता कोहरे हिने पाहिला, तिच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी सचिन पाटील याच्या विरोधात घाटंजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक किशोर भुजाडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मृताची पत्नी पुनेरता कोहरे, पंच साक्षीदार विवेक ठाकरे, गटल दंभारे, घाटंजी ग्रामीण याचे वैद्यकीय कारी डॉ. राजेंद्र वा बन्सोड, तपास कारी किशोर भुजाडे इतर परिस्थितीजन्य है ग्राह्य मानून आरोपाला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड ठोठावला. सरकारी पक्षाच्या वतीने सहा, सरकारी वकील विजय एस. तेलंग यांनी बाजू मांडली. त्यांना घाटंजी ठाण्यातील पैरवी अधिकारी जमादार सारिका बोधनकर यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT