गांजाची शेती (File Photo)
यवतमाळ

Ganja Seized Yavatmal | सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

अवधूतवाडी पोलिसांची अंबानगर येथे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Woman Arrested Selling Ganja

यवतमाळ : अवैधरित्या गांजाची विक्री करणार्‍या एका महिलेला पोलिसांनी रंगेहात अटक केली. तसेच तिच्याकडून अडीच किलो गांजा असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. १७) अवधूतवाडी पोलिसांनी अंबा नगर येथे केली.

अवधूतवाडी पोलिस ठाणे हद्दीतील अंबानगरात एक महिला अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी अंबानगर येथे सापळा रचून छापा टाकला. तेव्हा संबंधित महिलेकडून एकूण दोन किलो 528 ग्रॅम अंदाजे 50 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

याप्रकरणी संबंधित महिला आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी भोरे व अमोल कोळी तसेच पोलिस निरीक्षक अजित कदम यांच्या मार्गदर्शनात अवधूतवाडी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बारड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार, सुरेश मेश्राम, विशाल भगत, कमलेश भोयर, मोहम्मद भगतवाले, सचिन राठोड, योगेश चोपडे व राज कांबळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT