Arni Road chain snatching
यवतमाळ : दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने हिसकावून पळ काढल्याची घटना येथील आर्णी रोडवरील श्रमिक सोसायटीत घडली.
लता प्रमोद बंग असे महिलेचे नाव आहे. त्या घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधून असलेले दोन अज्ञात चोरटे विनानंबरच्या दुचाकीने जवळ आले. गौरकार यांचे घर कुठे आहे, असे विचारून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ९६ हजार ५०० रुपयांची १५ ग्रॅम ६० मिली वजनाची पोत हिसकावून पळ काढला.
याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. शहरात यापूर्वीही महिलांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.