Accident News file photo
यवतमाळ

Yavatmal Accident | देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

खुनी नदीच्या पुलाजवळ अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

पुढारी वृत्तसेवा

Hit And Run Yavatmal

यवतमाळ : केळापूर येथील जगदंबा मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या मित्रांवर काळाने घाला घातला. खुनी नदीच्या पुलाजवळ रविवारी रात्री अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात अजय उत्तम मेश्राम (२५) रा. येरणगाव, ता. घाटंजी व रमेश ढाले (३०) या दोघांचा मृत्यू झाला, तर अविनाश शंकर गिनगुले हा गंभीर जखमी झाला.

अजय मेश्राम हा रविवारी सायंकाळी त्याचा मित्र अविनाश गिनगुले आणि रमेश ढाले यांच्यासोबत दर्शनासाठी गेला होता,ते तिघेही एमएच-२९-सीजी१४६४ क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीने केळापूर-पांढरकवडा बायपास मार्गे येरणगावकडे निघाले होते. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास खुनी नदीच्या पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. धडकेची तीव्रता

इतकी होती की, तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात अजय मेश्राम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अविनाश गिनगुले आणि रमेश ढाले यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रमेश ढाले याचेही निधन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT