MSEDCL  pudhari photo
यवतमाळ

MSEDCL Action Yavatmal | यवतमाळ जिल्ह्यातील सातशे ग्राहकांचा वीजपुरवठा तोडला

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर लघुदाब वीज ग्राहकांकडे तब्बल 111 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत

पुढारी वृत्तसेवा

Yavatmal Electricity Supply Disconnected

यवतमाळ : घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर लघुदाब वीज ग्राहकांकडे तब्बल 111 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहेत. या रक्कमेच्या वसुलीसाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान बिल भरण्यास प्रतिसाद न देणार्‍या जिल्ह्यातील 683 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

विजेचा वापर करणारे हजारो ग्राहक नियमित बिलाचा भरणा करीत नाही. परिणामी, थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. जिल्ह्यातील हजारो ग्राहकांकडे वीजबिलाचे तब्बल 111 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील दारव्हा विभागाकडे 18 कोटी 34 लाख, पांढरकवडा विभागाकडे 24 कोटी 25 लाख, पुसद विभागाकडे 29 कोटी 39 लाख, तर यवतमाळ विभागाकडे 38 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी आहे.

दरम्यान, वीज बिल वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान, वीज बिल भरण्यास प्रतिसाद न देणार्‍या जिल्ह्यातील 683 ग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी महावितरणने विविध पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांनी वीजपुरवठा चालू व थकीत वीज बिले तातडीने भरावीत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT