यवतमाळ : दुर्गामाता विसर्जनावेळी तीन तरुणांचा बडून मृत्यू झाल्याची घटना आर्णी तालुक्यात घडली. ही घटना रविवारी (दि.15) घडली. अरुण तुळशीराम जाधव (३७, रा. माळहिवरा), मिथुन लोहबा राठोड (२६, रा.चिकणी कसबा), प्रकाश राजूरकर (वय ५६) असे तीन मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर माळहिवरा, चिकणी कसबा आणि रामनगर तांडा येथे या घटना घडल्याने शोककळा पसरली आहे.
अरुण जाधव हे असे मृताचे नाव आहे. ते दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीसोबत नाल्यावर गेले. तेथे देवी विसर्जन करून सर्वच जण गावात परत आले. अरुण जाधव रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाहीत. त्याच वेळी गावात ऑर्केस्टा सुरू असल्याने अरुण जाधव हे तेथेच असतील, असा समज कुटुंबीयांनी करून घेतला. त्यामुळे रात्री त्यांचा शोध घेतला नाही. सोमवारी सकाळी गावालगतच्या नाल्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला, तेव्हा ही घटना उघड झाली. चिकणी कसबा येथील मिथुन लोहबा राठोड (२६) यांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. रविवारी सायंकाळी ४:३०जवळा गावालगतच्या दत्त टेकडीच्या बाजूला असलेल्या तलावात माँ दुर्गेचे विसर्जन केले जात होते. त्यावेळी प्रकाश राजूरकर (वय ५६) पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती होताच पोलिस दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. तपास आर्णी पोलिस करीत आहे.