Drought : बैलांच्या पाठीवर चितारल्या दुष्काळाच्या व्यथा ! file photo
यवतमाळ

Drought : बैलांच्या पाठीवर चितारल्या दुष्काळाच्या व्यथा !

बैलपोळा : पारध येथील शेतकऱ्याची कल्पकता, दुष्काळाकडे वेधले लक्ष

पुढारी वृत्तसेवा

The suffering of drought depicted on the backs of bulls

पारध, पुढारी वृत्तसेवाः बैल पोळा म्हणजे शेतकरी आणि त्याच्या जीवाभावाच्या सर्जा-राजाच्या नात्याचा उत्सव. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मात्र, यंदाच्या बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट असल्याने बैलांच्या अंगावरच दुष्काळाच्या व्यथा रेखाटल्याचे पहावयास मिळाले.

युवा शेतकरी विशाल विनायक लोखंडे यांनी खिल्लारी बैलांच्या जोडीवर दुष्काळाचे चित्र साकारत शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. बैलांच्या अंगावर रेखाटलेल्या चित्रांमध्ये करपलेली शेती, पाण्याची टंचाई, पावसाची प्रतीक्षा, चिंताग्रस्त शेतकरी आणि शेतीसमोरील संकटे यांचे वास्तववादी चित्रण करण्यात आले. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे.

दुष्काळाने करपलेली जमीन, पाण्याअभावी ओसाड पडलेली शेती आणि संकटात सापडलेला शेतकरी या चित्रांमधून ग्रामीण भागातील वास्तव अधोरेखित करण्यात आले. वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात राबणाऱ्या बैलांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

दुःख चितारले

शाल लोखंडे यांनी या परंपरेला वेगळा सामाजिक आयाम देत बैलांच्या अंगावरच शेतकऱ्यांचे दुःख चितारले. त्यामुळे ही बैलांची जोडी केवळ पोळ्याची शोभा न ठरता शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणारी जिवंत चित्रफीतच ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT