शेतात लावण केलेला ३५ किलो गांजा पोलिसांकडून जप्त Pudhari Photo
यवतमाळ

शेतात लावण केलेला ३५ किलो गांजा पोलिसांकडून जप्त; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : शिरपुल्ली शिवारात लावलेल्या गांजाच्या शेतातून पोलिसांनी ३५ किलो ओला गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.1) रात्री ८ वाजेच्या सुमारास महागाव व दराटी पोलिसांनी संयुक्तरित्या केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रामेश्वर पुंजाजी पोटे (वय.५५) आणि परमेश्वर पुंजाजी पोटे (वय.५२) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या शेतात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे धाड टाकून कारवाई करण्यात आली. फुलसावंगी परिसरातील मागील काही दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे. महागाव पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वडद येथे शेतात धाड टाकून दहा किलो गांजा जप्त केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT