मध्यप्रदेशातील तीन गांजा तस्कर गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात

१९ किलो गांजासह ४.४९ लाखाचा मुद्देमाल जप्त
cannabis smugglers arrested
मध्यप्रदेशातील गांजा तस्करांना अटक
Published on
Updated on

गोंदिया : जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांनी शनिवार ( दि. २८) केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यातील तीन गांजा तस्करांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून १९ किलो गांजासह ४.४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

cannabis smugglers arrested
Human Trafficking Case | आंतरराष्ट्रीय मानवी तस्कर प्रकरणात नाशिकचा युवक गजाआड 

विजय रमेश गोखे (वय ३३, रा. आझाद वॉर्ड, शिवनी मध्यप्रदेश), नीलेश सुदेश दुबे (वय २५, रा. चंद्रशेखर वार्ड, शिवनी ), राजकुमार लेखराम यादव ( वय ४० रा. भगतसिंग वॉर्ड, हाडी गोडाऊन, टिपू सुलतान चौक ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी येथे काही तस्कर १९ किलो गांजाची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती सालेकसा पोलीसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे सालेकसा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ७.४५ च्या सुमारास टोयगोंडी परिसरात सापळा कारवाई करून विना नंबरच्या २ दुचाकीने जाणाऱ्या तीन आरोपींना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडून ३ लाख ८९ हजार २०० रुपयांचा १९.४६० किलो गांजा मिळून आला. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १९.४६० किलो गांजा व ६० हजार रुपये किमतीच्या दोन नंबर नसलेल्या दुचाकी असा ४ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बुराडे करत आहेत.

cannabis smugglers arrested
Drug Smugglers : पश्चिम महाराष्ट्र, सीमाभागात ड्रग्ज तस्कर सक्रिय; सीमाभागात कोट्यवधींच्या उलाढाली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news