लोककला महोत्सवाची प्रशासनाने ‌‘टाकली पाटी‌’  pudhari photo
यवतमाळ

Folk art festival : लोककला महोत्सवाची प्रशासनाने ‌‘टाकली पाटी‌’

स्थानिक कलाकारांना डावलल्याने नागरिकांतून नाराजी

पुढारी वृत्तसेवा

कळंब : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित राज्यातील लोककला, लोकपरंपरा यांचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी वैशिष्ट्‌‍यपूर्ण लोककला महोत्सवाचे आयोजन कळंब शहरात करण्यात आले आहे. हा महोत्सव 12 व 13 तारखेला शहरात परळी रोडवरील जयभवानी फंक्शन हॉलमध्ये होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांना संधी न दिल्याने संताप व्यक्त होत आहे. याची प्रसिध्दीही म्हणावी तशी न केल्याने प्रशासनाने केवळ ‌‘पाटी टाकण्याचे‌’ काम केल्याचा आरोपी होत आहे.

या कार्यक्रम फकत दोन दिवसात उभा केल्याचे दिसून आले.महोतसवाचे बॅनर एक दिवस अगोदर शहरात दिसले तेव्हा शहरवासीयांना व स्थानिक कलाकारांना आपल्या शहरात कार्यक्रम आहे असे समजले व मोजक्याच पत्रकारांना प्रेस नोट दिल्याने आयोजकांना कार्यक्रम लगभग उरकायचा आहे असेच दिसून आले.

एकंदरीतच हा महोत्सव एक प्रक्रियेचा भाग दिसून आला. या महोत्सवात आयोजनाची जबाबदारी कोणावर हेच समजत नव्हते स्थानिक कलाकार उपस्थित नव्हते स्थानिक कलाकार, पत्रकार यांना निमंत्रित करण्यात आले नाही. तसेच या कार्यक्रमाचे कंट्रोलिंग धाराशिव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र धाराशिव येथील सहायक प्राध्यापक धाराशिव येथून गणेश शिंदे हे करत असल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की माझे नातेवाईक वारलयाने मी कार्यक्रमास हजर राहू शकलो नाही.

आम्हाला जेवढी माहिती मिळाली तेवढया कलाकारांशी संपर्क साधून स्थानिकांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे .व एका कर्मचाऱ्यावर कार्यक्रमाची जबाबदारी दिली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी मंत्रिमहोदय ते स्थानिक आमदार यांची नावे पत्रिकेत दिसुन आली, परंतु नगराध्यक्ष वगळता कुणीही फिरकले नाही त्यामूळे आयोजकांना मनमानी आयोजन करण्यास चांगली संधीच प्राप्त झाली आहे.

कळंब ला कलाकारच नाहीत?

कळंब तालुक्यात उत्कृष्ट भजनी मंडळे , भारुड गाणारे, लोककला सादर करणारे कलाकार असुन सुध्दा केवळ आयोजकांनी त्यांच्या खास मर्जीतील कलाकारांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या उदात्त धोरणाला आयोजकांनी बगल दिल्याचे दिसून येते. यावर गतिमान सरकार लक्ष देणार का असा प्रश्न स्थानिक कलाकार विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT