यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
फाळेगाव येथे नदीमध्ये आलेल्या पुरामध्ये वाहून जाऊन दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि.3) ते दोघेही नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी विटाळा गावाजवळ पुलावर दुचाकी घसरून वर्धा नदीपात्रात कोसळली. नदीला पूर असल्याने जाधव दाम्पत्य दुचाकीसह वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच वर्धा जिल्हा प्रशासनाने दोघांचा शोध सुरू केला. सलग तीन दिवस शोधमोहीम राबविल्यानंतर एका दिवसाच्या अंतराने दोघांचे मृतदेह हाती लागले. रवींद्र जाधव (वय ४०) आणि अंकिता जाधव (वय ३५) असे मृत दांपत्याचे नाव आहे.
नातेवाईकांकडून परत येताना ते विटाळा येथील पुलावरून वर्धा नदीचा पूर ओसरून लागला होता. त्यामुळे पुलावर गाळ साचला होता. या गाळातून दुचाकी पुढे नेत असताना दुचाकी स्लिप झाली व दोघेही पुलावरून दुचाकीसह नदीपात्रात कोसळले. पुराच्या पाण्यात ते वाहून गेले. घटनेची माहिती फाळेगावात पोहोचताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दिवसभर शोध घेऊनही जाधव दाम्पत्य हाती लागले नाही. रात्र झाल्याने रेस्क्यू मोहीम थांबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी मोहीम सुरू केल्यानंतर रवींद्र जाधव यांचा मृतदेह हाती लागला. त्यांच्या मागे आई,- वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
रवींद्र जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी अंकिताचा मृतदेह मिळून आल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. दोघांवरही बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव शोकमग्न वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले