विदर्भ

Yawatmal Accident : चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू

backup backup
पुढारी वृत्तसेवा; दिग्रस येथून लग्न कार्य आटोपून परत येणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात नेर येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
नागोराव चिरडे (वय५५) आणि सुमन नागोराव चिरडे (वय ५०), असे मृत पती, पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघेही आपल्या दुचाकीने (क्र. एमएच २९ – बीएच ८६२७) दिग्रस येथे एका विवाह समारंभाला गेले होते. विवाह आटोपून ते सायंकाळी परत निघाले असता, नेर तालुक्यातील अकोला-मुकिंदपूरजवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. चिरडे दाम्पत्य शेतकरी असून, शेतात परिश्रम करायचे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT