विदर्भ

यवतमाळ : लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून

backup backup

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : गावात दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावानेच रागाच्या भरात खून केली. ही धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील साखरा येथे गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. विशाल जयवंत मेश्राम (वय ३२ रा. साखरा खुर्द) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घाटंजी तालुक्यातील साखरा गावातील वास्तव्यास असणारे मेश्राम कुटुंब दोन मुलांसह राहत होते. मोठा मुलगा विशाल हा विवाहीत असून त्याला एक मुलगा आहे. तो स्वतः ट्रॅक्टर चालक होता, त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याने कुटूंबीय त्रस्त झाले होते. आज लहान भाऊ दिलीप उर्फ लाल्या घरी काम करत असताना विशाल हा मद्यप्राशन करून आला. नेहमीप्रमाणे त्याने वाद घातला. यावेळी लहान भावाचा राग अनावर झाला व रागाच्या भरात लोखंडी सबलीने मारहाण केली. डोक्यात जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आला असून पोलिसांनी मारेकरी दिलीप उर्फ लाल्या मेश्राम याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी ठाणेदार सुष्मा बावीस्कर करीत आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT