arrest 
विदर्भ

Washim Police Action | वाशिममध्ये पाच दुचाकींसह संशयितास अटक; पुणे व हिंगोलीतील गुन्ह्यांची उकल

रिसोड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एका संशयितास अटक करत पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाशिम, हिंगोली आणि पुणे जिल्ह्यातील गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

वाशीम, ११ (पुढारी वृत्तसेवा): शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रिसोड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे रिसोडसह हिंगोली आणि पुणे जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलीस कारवाई दरम्यान सदानंद टॉकीजजवळ राहणाऱ्या अंकुश विश्वनाथ राऊत (वय ३०) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून दोन हिरो स्प्लेंडर, एक हॉरनेट, एक प्लॅटिना आणि एक शाईन अशा एकूण पाच जुन्या वापरत्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या या वाहनांची अंदाजे किंमत दोन लाख ऐंशी हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

तपासादरम्यान, रिसोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप क्रमांक ९९९/२०२६ कलम ३०३(२) बीएनएस या गुन्ह्याव्यतिरिक्त गोरेगाव पोलीस ठाणे (जिल्हा हिंगोली) येथील अप क्रमांक १०४/२०२६ तसेच भोसरी पोलीस ठाणे (जिल्हा पुणे) येथील अप क्रमांक १२९/२०२६ या चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक मास्कर, पोलीस हवालदार गजानन झगरे, सुरज खंडके, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल सुनील तायडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT