विदेशी पाहुण्यांचे आगमन www.pudharinews. 
विदर्भ

वाशिम : एकबुर्जी प्रकल्पात १७० प्रजातींच्या विदेशी पाहुण्यांचे आगमन

backup backup

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : वाशीम जिल्ह्यातल्या एकबुर्जी धरण प्रकल्पावर दुर्मिळ असणाऱ्या ग्रेटर प्लेमिंगोसह १७० प्रजातींच्या विदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. गुजरातमधल्या कच्छच्या रणातून भारताच्या दक्षिण किनारपट्टीकडे मार्गस्थ होत असताना फ्लेमिंगो पक्षांचा विदर्भातला एकबुर्जी जलाशय हा महत्वाचा थांबा आहे.

ग्रेटर प्लेमिंगोसह स्थलांतरीत तसेच स्थानिक प्रजातींचे विविध पक्षी नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधी दरम्यान एकबुर्जी जलाशयावर वास्तव्याला येत असतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसह पर्यटक या विदेशी पाहुण्यांची एक झलक पाहण्यासाठी एकबुर्जी धरण परीसरात गर्दी करत आहेत.

अपट्टकादंब, काळा करकोच, तरंग बदक, मळकट बदक, खापट्या बदक, तलवार बदक, चक्ररांग, लालसरी बदक, शेंडी बदक, दलदली भोवत्या, सर्पगरूड, पाणलावा, सामान्य हिरवा टिलवा, चक्रवाक, सामान्य तुतारी, दलदली तुतारी, हिरवी तुतारी, ठिपकेदार तुतारी, छोटा टिलवा, शेकट्या, मोठा करनानक, छोटा अर्ली, पलासचा कुरव, कल्लेदार सुरथ, कुरव चोचीचा सुरथ, मासेमार घुबड, ढिवर आदी पक्ष्यांचा यात समावेश आहे.

विदर्भात केवळ वाशीम मध्येच या तलावात पक्षांना लागणारे 'अल्गी ' हे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे दरवर्षी या प्रकल्पावर हे विदेशी पाहुणे येतात. खाद्य भरपूर असल्यामुळे ६ महिने मुक्काम करुन उन्हाचा पारा वाढु लागताच एप्रिल महिन्यअखेर दक्षिण किनारपट्टीकडे मार्गक्रमण करतात.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT