वाशीम, पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव सतर्क असून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिनाभरात जबरी चोरी व घरफोडीसह इतर चोरीचे तब्बल २३ गुन्हे उघड केले आहेत. त्यामध्ये १२ आरोपींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत त्यांच्याकडून १५.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामकृष्ण महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, दिपक घुगे, विठ्ठल सुर्वे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी पार पाडली.