Washim Youth end of life 
वाशिम

Washim Youth end of life|रिसोड शहरात युवकाने गळफास लावून संपवले जीवन

रिसोड शहरात युवकाने गळफास लावून संपवले जीवन

पुढारी वृत्तसेवा

वाशीम - रिसोड शहरातील महात्मा फुले नगर येथील एका घरात युवकाने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

रमेश नाईकवाडे (वय अंदाजे ३०, रा. महात्मा फुले नगर, पॉवर हाऊस जवळ रिसोड) असे युवकाचे नाव आहे. जीवन का संपवले? याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मात्र दारूचे व्यसन व सततचे आजारपण याला कंटाळूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा परिसरात होत आहे. पुढील तपास रिसोड शहर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT