Washim ST bus accident news
वाशिम: पंढरपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एका एसटी बसचा आज (दि.२०) सकाळी वाशिमजवळ भीषण अपघात झाला. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कळंबा महाली गावाजवळ ही घटना घडली. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅकचा टायर पंक्चर झाल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला उभा होता. याचवेळी वेगाने येणाऱ्या एसटी बसने ट्रकला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये बसमधील ६ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.