Samruddhi Mahamarg Nagpur Corridor car crash Pudhari
वाशिम

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने कारचा अपघात; जीवितहानी टळली

मुंबईहून अकोल्याकडे जात असलेल्या कारचा समोरील टायर अचानक फुटला

पुढारी वृत्तसेवा

Samruddhi Mahamarg Nagpur Corridor car crash

वाशिम : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि.८) सकाळी सुमारे ११:१५ वाजता टायर फुटल्याने कारचा अपघात घडला. ही घटना नागपूर कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक २५३ येथे घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून अकोल्याकडे जात असलेल्या MH30 BB 1911 या क्रमांकाच्या कारचा समोरील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावरील लोखंडी बॅरियरवर जाऊन आदळली. या वेळी वैभव महाजन हे वाहन चालवत होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. PSI सरनाईक, पोलीस कॉन्स्टेबल काकडे व इतर कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आवश्यक ती खबरदारी घेतली.

अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे हलवण्यात आले आणि त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहन चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. विशेषतः वाहनांच्या टायरची नियमित तपासणी करणे तसेच वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT