Samruddhi Expressway Parking Scam Pudhari photo
वाशिम

Washim Samruddhi Expressway Parking Scam|वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर पार्किंगच्या नावाखाली अवैध वसुली!

Samruddhi Expressway Parking Scam-समृद्धी महामार्गाची संरक्षण भिंत तोडून ढाबा सुरू

पुढारी वृत्तसेवा

वाशीम - वाशीमच्या समृध्दी महामार्गावर एका पेट्रोल पंपावर ट्रक चालकाकडून पार्किंगच्या नावाखाली अवैध वसुली केली जात आहे. हा प्रकार दि. १० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा समोर आला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी योगेश कुंभजेकर अँक्शन मोडमध्ये आले असून सदर प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

ट्रक चालकांकडून 100 ते 150 रुपये कोणतीही अधिकृत पावती न देता घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पार्किंगचे पैसे भरल्यानंतरही उभ्या ट्रकमधून चोरीच्या घटना घडत असल्याचा आरोप ट्रक चालकांनी केला आहे.

याशिवाय समृद्धी महामार्गालगतची संरक्षण भिंत तोडून पेट्रोल पंपाच्या बाजूला ढाबा सुरू करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दखल घेत परिवहन विभाग आणि पोलीस विभागाला चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक असल्यास MSRDC मार्फतही चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT