Crime News File Photo
वाशिम

Washim Farmer Death| अल्पभुधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Washim farmer ends life

वाशीम: रिसोड तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकरी रोहिदास वामन जाधव (वय 65 ) यांनी सोमवारी (दि. 18) सकाळी 11 च्या सुमारास आपल्या राहत्या घरातील टिनपत्रा खालील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेत जीवन संपविले.

कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनात ही घटना आल्यानंतर घटनेची माहिती रिसोड पोलिस स्टेशनला कळविण्यात आली. ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक राजेंद्र वानखेडे,जमादार ज्ञानेश्वर बेले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणी साठी ग्रामीण रूग्णालय रिसोड येथे हालविण्यात आला आहे.

मांडवा येथील रोहिदास वामन जाधव हे अल्पभुधारक शेतकरी असून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळी पालन करीत होते. जाधव यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी परिवार आहे.

तर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखेडे,जमादार ज्ञानेश्वर बेले करीत आहेत. रोहिदास यांच्या डोक्यावर काही कर्ज असल्याची चर्चा घटनास्थळी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT