वाशिम

वाशिम: कारंजा येथील तरूणावर स्थानबद्धतेची कारवाई

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा: कारंजा शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या स्वप्नील अशोक काळे (वय २२) याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातील कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची ही तिसरी कारवाई आहे.

स्वप्नील काळे याच्याविरुद्ध कारंजा शहर आणि मानोरा पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करून परिसरात दहशत पसरविणे आदी प्रकरणात गंभीर कलमान्वये एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्याने घातक शस्त्रासह परिसरात दहशत पसरवित धाक दाखविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यव्यवस्थेस बाधा उत्पन्न होते.

त्यामुळे त्याच्यावर MPDA अधिनियम, १९८१ (सुधारणा १९९६, २००९ व २०१५) चे कलम ३(२) अन्वये 'धोकादायक व्यक्ती' या सदराखाली प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावाचे अवलोकन करून दि. ५ सप्टेंबररोजी त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अश्याप्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जाणार आहेत, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

काळे याच्याविरूद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण आणि कारंजा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बुद्धू रेघीवाले यांनी काम पाहिले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT