वाशिम: पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा म्युझियमचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. श्री. क्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) येथे हा कार्यक्रम गुरुवारी (दि.२६) सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत राहणार आहेत. तरी बंजारा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री राठोड यांनी केले आहे. या कार्यक्रमाची बंजारा बोली भाषेतील पत्रिका पालकमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे.