वाशिम पोलिसांकडून डीजेमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना

पोलिसांकडून डीजे आणि लेजर यांच्यावर बंदी
Conception of DJ-free Ganeshotsav by Washim Police
वाशिम पोलिसांकडून डीजेमुक्त गणेशोत्सवाची संकल्पनाFile photo
Published on
Updated on

वाशिम : अजय ढवळे

वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी मंडळांनी ७८४ गणेशमुर्तीच्या स्थापना केल्या आहेत. याबरोबरच सोमवार (दि.१६) ते गुरुवार (दि. १९) या कालावधीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकींचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यामध्ये संपुर्ण गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वाशिम पोलीसांतर्फे प्रभावी प्रतिबंधंक कारवाया करण्यात येत आहेत. याबरोबरच यावर्षीचा गणेशात्सव डीजेमुक्त करण्याचा पोलिस प्रशासनाचा मानस आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलीस जिल्हा अधीक्षक अनुज तारे यांनी डीजेमुक्त गणपती उत्सव ही संकल्पना राबवावी असे आवाहन केले आहे. ध्वनिप्रदुषण नियमावली अन्वये अनुज तारे जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हयातील ध्वनिप्रदुषण नियमण समितीचे सक्षम अधिकारी आहेत. त्यानुसार त्यांनी ध्वनीप्रदुषण विनिमय व नियंत्रण अधिनियम २००० कलम ८ चे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

Conception of DJ-free Ganeshotsav by Washim Police
Pune News | लेजर लाइट लावल्यास डीजे जागेवरच जप्त करणार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लेजरमुळे डोळ्यांना होणाऱ्या सर्व इजांमुळे लेजर लाईटला पुर्णतः बंदीचे आवाहन केले आहे. डॉक्टरांनी तसेच सामाजिक संघटनांनी ध्वनीप्रदुषण, लेझर लाईट शोमुळे सर्वसामान्य नागरिक, मुले, वृध्दांना यांना इजा होऊन त्यांचे ज्ञानेंद्रीय डोळे, कान निकामी होत असल्याने डीजे. लेजर लाईटशो वर बंदी घालावी असे निवेदन जिल्हयातील पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे वाशिम यांना दिले आहे.

कस्तुरी क्‍लब आयोजित धमाल डीजे पार्टी

जिल्हयामध्ये शुक्रवार (दि.13) पर्यंत एकुण ०९ डीजे. धारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमधून पोलिस प्रशासनाने १ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलीस आणि आर.टी.ओ. यांनी संयुक्तरित्या डी.जे.चे वाहनात फेरबदल, फिटनेस व इतर वाहनातील दोषांसाठी डीजेचे वाहन डिटेन करुन कारवाई केली आहे. ५७ डि.जे.धारकांना ध्वनीप्रदुषण विनिमय व नियंत्रण अधिनियम २००० कलम ८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत पोलीस विभागातर्फे नोटीस देण्यात आल्या आहेत. श्रीगणेश मंडळांना सुध्दा ध्वनी प्रदुषण होवु नये करीता नोटीस देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास डि.जे. धारकांचे सर्व परवाने रद्द करुन डि.जे धारक/मालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणारे आहे. जिल्हया बाहेरील व जिल्हयातील डि.जे. संबंधाने पोलीस व आर.टी.ओ. विभाग यांचे वतीने संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. डि.जे. व लेजर लाईटशो मुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news