Washim Municipal Council
वाशिम : वाशिम नगर परिषदेच्या व जिजा ऍग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया केंद्र (Material Recovery Facility – MRF) चे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन पालक मंत्री व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांची उपस्थिती होता.
उद्घाटन समारंभास अनिल केंदळे (नगराध्यक्ष), राजु भांदुर्गे (उपनगराध्यक्ष), बाबुराव बिक्कट ( जिल्हा सहआयुक्त) निलेश गायकवाड (मुख्याधिकारी न.प. वाशिम), सुदाम चव्हाण (आरोग्य निरीक्षक न.प. वाशिम) यांची विशेष उपस्थिती लाभली.
या केंद्रामार्फत शहरातील ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे कचऱ्याचे पुनर्वापर योग्य साहित्य वेगळे करून पर्यावरणपूरक व्यवस्थापन करता येणार आहे. शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणास मोठी चालना मिळणार आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांनी कचरा विलगीकरणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. “स्वच्छ व सुंदर वाशिमसाठी एक पाऊल” या संकल्पनेतून हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.