PM Surya Ghar Yojana Washim 
वाशिम

PM Surya Ghar Yojana Washim | परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

पीएम सुर्यघर मोफत योजनेमुळे वीज बिल शुन्यावर

पुढारी वृत्तसेवा

वाशीम : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी “प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा” लाभ घेत महावितरण अकोला परिमंडळातील वीज ग्राहक पर्यावरण पुरक सौर ऊर्जेबाबत जागरूक झाले आहे. परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वत:ला लागणारी वीज स्वताच निर्मिती केली आहे. त्यामुळे या ग्राहकांचे वीज बिल शून्यापर्यंत कमी झाले आहे.

महावितरणकडून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलडाणा), अजय शिंदे (वाशीम) आणि प्रतिक्षा शंभरकर (अकोला) यांच्या पुढाकाराने विशेष प्रयत्न केले जात आहेत. ग्राहकांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, तांत्रिक मार्गदर्शन तसेच नेट मीटरिंग सुविधा जलदगतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.

महिन्याला ३०० युनिट वीज वापर असणाऱ्या वीज ग्राहकांना मोफत वीज देणे, हे या योजनेचे उद्धीष्ट आहे. दरम्यान ग्राहकांना सौर ऊर्जा स्थापनेसाठी प्रोत्साहन म्हणून प्रति किलोवॅट ३० हजार रूपये, याप्रमाणे प्रथम दोन किलोवॅटला ६० हजार आणि तिसऱ्या किलोवॅटसाठी १८ हजार रूपये, याप्रमाणे ७८ हजार रूपयाचे अनुदान दिल्या जाते. ग्राहकाचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होते. तसेच सौर प्रकल्प बसविण्यासाठी बॅंकेमार्फत कर्जाची सुविधा देखिल उपलब्ध आहे.

परिमंडळात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेचा लाभ घेत सौर ऊर्जानिर्मिती करणारे ३३ हजार ३८० वीज ग्राहक आहेत. यात अकोला जिल्ह्यातील १२ हजार ८६४ ग्राहक, बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार ५७६ आणि वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ९४० ग्राहकाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT