मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील अपघातग्रस्त कार  Pudhari
वाशिम

Washim Car Accident | भरधाव कारच्या धडकेत ७ वर्षीय मुलीचा मृत्यू; आठवडी बाजारातून आजोबासोबत घरी येताना अपघात

मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथे घटना, अपघात सीसीटीव्हीत कैद

पुढारी वृत्तसेवा

Mangrulpir Road Accident

वाशीम : मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथे भरधाव कारच्या धडकेत सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.४) घडली. आठवडी बाजारातून आजोबांसोबत घरी परतत असताना रस्ता ओलांडण्याच्या वेळी हा अपघात झाला. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडी आपल्या आजोबांसोबत आठवडी बाजारात गेली होती. बाजारातून परतताना रस्ता ओलांडत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली.

स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT