Washim Crime | दोन ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक; पोलिसांची कारवाई

नांदेड–अकोला महामार्गावरील तोंडगाव टोलनाक्यावर कारवाई
Washim Illegal Cattle Transportation
Washim Illegal Cattle Transportation Pudhari
Published on
Updated on

Washim Illegal Cattle Transportation

वाशीम : वाशीम जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोंडगाव टोलनाक्यावर अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून दोन ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार नांदेड–अकोला महामार्गावरील तोंडगाव टोलनाक्यावर दोन्ही वाहने अडविण्यात आली.

Washim Illegal Cattle Transportation
Washim Court : वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू : ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप

तपासणीदरम्यान दोन्ही ट्रकमध्ये मिळून सुमारे २५ गोवंश आढळून आले. जनावरांची कोंबून व अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने आणि गोवंश ताब्यात घेतला.

या प्रकरणी ट्रकचालक गजानन राऊत (रा. मंगरुळपीर) आणि देवराव बर्गे (रा. दापोरी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news