Court Verdict  Pudhari
वाशिम

Washim Crime | मंगरुळपीर येथे लग्नाचे आमिषाने अत्याचार; नराधमास २० वर्षांचा कारावास

मंगरुळपीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दिला निकाल

पुढारी वृत्तसेवा

Mangrulpir Court Verdict

वाशिम : येडशी (कुंड) येथील पाहूणा म्हणून आलेल्या एका नराधमाने साडूच्या मुलीस लग्न करण्याचे आमिष दाखवून पुण्यात अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगरुळपीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी गुरुवारी (दि.३०) हा निकाल दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, २०२१ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील मानोरा पोलीस स्टेशन हद्दीतील येडशी (कुंड) येथील आरोपी हा पाहूणा म्हणून साडूच्या घरी गेला होता. त्याने साडूच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पुणे य़ेथे पळवून नेले. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

मंगरुळपीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र सादर केले. न्यायालयात सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायाधीश प्रज्ञा एस काळे यांनी दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकला. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी निकाल दिला.

तीन वर्षे साधा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. भादंवि ३६६ नुसार पाच वर्षे साधा कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

तसेच पोक्सो कायद्यातील ४, ५ व सहकलम ६ च्या तरतुदीनुसार आरोपीला सुमारे २० वर्षांचा सक्षम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. दंडाच्या रकमेतून पीडितेला सात हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिल आहेत.

या प्रकणात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस. के. गिमेकर यांनी सरकारच्यावतीने मुद्देसुद युक्तिवाद केला. पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. तर एएसआय नामदेव बावणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT