Washim News | संभाव्य आंदोलने व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

६ ऑगस्टपर्यंत शस्त्रे बाळगण्यास, प्रक्षोभक साहित्य प्रसारित करण्यास बंदी; नागरिकांना प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
Prohibitory Orders Washim
Prohibitory Orders Washim AI Photo
Published on
Updated on

Prohibitory Orders Washim

वाशिम : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच आगामी धार्मिक उत्सव, जयंती कार्यक्रम आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये संपूर्ण वाशिम जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश २४ जुलै २०२६ पासून ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४.०० वाजेपर्यंत) लागू राहणार आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ राज्यभर होणाऱ्या आंदोलनांची शक्यता, २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी, २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा तसेच १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त होणारे विविध कार्यक्रम लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Prohibitory Orders Washim
Washim news : निकृष्ट दर्जाच्या तांदुळ पुरवठ्याविरोधात स्वस्त धान्य दुकानदार आक्रमक

या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच ज्वालाग्राही अथवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा शस्त्रासारख्या वस्तूंचा साठा करणे, व्यक्ती अथवा मनुष्याकृतींच्या प्रतिमांची विटंबना करणे, तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल, धार्मिक भावना दुखावल्या जातील किंवा राज्याच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल अशा प्रकारची प्रक्षोभक भाषणे, घोषणा, गीते, फलक, चित्रे किंवा अन्य साहित्य तयार करणे, प्रसारित करणे अथवा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Prohibitory Orders Washim
Washim News | मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; पुनर्तपासणीची सरपंचाची मागणी

हे आदेश सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांवर लागू राहतील. मात्र, शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news