वाशिम, लोणी बु. येथे चारित्र्यावर संशय पत्नीचा खून करून पतीने जीवन संपविले. File Photo
वाशिम

फोटोच्या बहाण्याने नेले अन् बायकोला दगडाने ठेचले: स्वतःही जीवन संपविले

पुढारी वृत्तसेवा

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने फोटो काढण्याच्या बहाण्याने तिला जंगलामध्ये नेले. आणि तिथे दगडाने ठेचून तिचा खून केला. त्या नंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपविले. ही धक्कादायक घटना लोणी बुद्रुक (ता. रिसोड) येथील मोहदरी शेत शिवारात शुक्रवारी (दि.५) घडली. मृत महिलेचा भाऊ अनिल चिमणाजी भोटाणे (रा. केसापूर, जि. हिंगोली) यांनी रिसोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उषा विलास सुर्वे (वय 35) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर विलास लिंबाजी सुर्वे (वय 40) असे मृत पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी बु. येथील मोहदरी शेतशिवारात शुक्रवारी सायंकाळी एक महिला मृतावस्थेत आढळून आली. पोलीस पाटील यांनी रिसोड पोलिसांना कळवले. अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत महिलेची ओळख पटवली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

मढी शेत शिवारात पतीने गळफास घेऊन जीवन संपविले

त्यानंतर मृत महिलेचा पती विलास सुर्वे यांने लोणार तालुक्यातील मढी शेत शिवारात निलगिरीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना आज (दि. 6) सकाळी 8 वाजता निदर्शनास आली. या घटनेची माहिती मढी गावचे पोलीस पाटील प्रभाकर गाडे यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिली असता लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पती - पत्नीच्या मृत्यूनंतर तर्कवितर्कांना उधाण

पती - पत्नीच्या मृत्यूनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोकराव गीते करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT