वाशिम

वाशिम: मोहगव्हान येथील दारू अड्डा उद्ध्वस्त: ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अविनाश सुतार

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: अनसिंग हद्दीतील ग्राम मोहगव्हान येथील धरणावरील हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून १५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि.१४) केली.

या प्रकरणी मोहम्मद पिरू नंदावाले, (रा. मोहगव्हान, ता. जि. वाशिम) आणि इतर ८ ते १० जणांविरोधात अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १०० लिटरच्या १० टाक्या, २०० लिटरच्या १२ टाक्या, १५ लिटरचे ७३ लोखंडी डब्बे, १५ लिटरचे २० प्लास्टिक कॅन असा एकूण ४७९५ लिटर मोहा माच सडवा व १५० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ५ लाख ९ हजार ५०० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रमाकांत खंदारे, गजानन अवगळे, गजानन झगरे, प्रशांत राजगुरू, अमोल इंगोले, प्रवीण शिरसाट, गजानन गोटे, महेश वानखेडे, संदीप डाखोरे सुषमा तोडकर व कविता गायकवाड यांनी केली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT