काटा गावातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला भर दिवसा कुलूप लागल्याने पशुपालक, शेतकरी व गावकरी यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट  Pudhari
वाशिम

Washim News | काटा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप; उपचाराअभावी गुरे ढोरे दगावली

उपचारांसाठी पशुपालकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

Washim Kata Veterinary Clinic Locked

वाशीम: वाशीम तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या काटा गावातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला भर दिवसा कुलूप लागल्याने पशुपालक, शेतकरी व गावकरी यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासनाने लाखो रुपये खर्चून उभारलेला इमारतील दवाखाना बंद असल्याने जनावरांवर वेळेत उपचार होत नसून पशुपालकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे.

बुधवारी (दि. १५) कोंडाळा या गावातील शेतकऱ्याला आपल्या २० बकऱ्यांना मुख रोग झाल्याने सदर दवाखान्यात उपचारासाठी आणल्याने तिथे कोणीच कर्मचारी उपस्थिती नसल्याने ही बाब उघडकीस आली आहे.संबंधित वैधकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे उपचारा अभावी आजवर अनेक गुरे ढोर दगावली आहेत.

त्यामुळे ग्रामीण भागात शेतीसोबतच पशुपालन हा प्रमुख व्यवसाय असताना पशुवैद्यकीय सेवा ठप्प झाल्याने जनावरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आजारी जनावरे, लसीकरण, कृत्रिम रेतन व इतर अत्यावश्यक सेवा बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दवाखान्यात नियमित अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने शासकीय सेवा केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

"शासनाचा दवाखाना कुलूपबंद आणि शेतकरी मात्र वाऱ्यावर" अशी संतप्त प्रतिक्रिया पशुपालकांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दवाखाना नियमित सुरू करावा, रिक्त पदे भरावीत आणि पशुवैद्यकीय सेवा सुरळीत कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पशुसंवर्धन विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT