Kashish Bayas Baseball  Pudhari
वाशिम

Washim News | वाशिमच्या कशिश बयसला बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक

महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी करत कांस्यपदक प्राप्त केले

पुढारी वृत्तसेवा

Kashish Bayas Baseball

वाशिम : तामसी येथील श्री विठ्ठल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वी ची विद्यार्थांनी कशिश संदीप बयस हिने नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत १९ वर्ष वयोगटातील महाराष्ट्र मुलींच्या बेसबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले.

महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी करत कांस्यपदक प्राप्त केले आहे. काशिशने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राची तसेच वाशिम जिल्हयाची प्रतिष्ठा उंचावली. श्री.विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालयाकडून कशिश बयस ने भाग घेतला होता.

क्रीडा शिक्षक दिनेश देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विभाग लीग मॅचेस राज्य व राष्ट्रीय (नॅशनल) स्तर पर्यंतचा शिखर गाठला आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक सूरज सोमटकर , प्राचार्य बांडे, माजी प्राचार्य गोपाल पाटील उंडाळ आदीसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT