आमदार श्याम खोडे प्रशासनाला घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर Pudhari Photo
वाशिम

Washim Heavy Rainfall | अतिवृष्टीचा फटका: आमदार प्रशासनाला घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

वाशिममध्ये अतिवृष्टी: नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश, मदतीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

वाशिम: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार श्याम खोडे यांनी पाहणी केली. खोडे हे वाशिम-मंगरूळपीर मतदारसंघाचे आमदार आहेत यावेळी प्रशासकीय अधिकारी समवेत होते.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, मंडळ अधिकारी पांडुरंग मापारी यांच्यासह तलाठी व इतर प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. आमदार खोडे यांनी प्रशासनाला सोबत घेऊन वाशिम तालुक्यातील ढिल्ली, जयपूर, टनका, सोनगव्हाण, उकडी पेन, सुकडी, वारला, सोडा सापळी, वाई आणि कळंबा महाली या गावांना भेट दिली.

पाहणी दौऱ्यादरम्यान, शेतीचे पीक, घरे आणि गुराढोरांचे झालेले मोठे नुकसान पाहून आमदार खोडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी सोबत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्येक नुकसानीची नोंद घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

"या कठीण काळात महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः आग्रही राहू," असे आश्वासन आमदार खोडे यांनी शेतकऱ्यांना दिले.दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रल्हाद गोरे, नथ्थु कापसे, दत्ताजी सुरजुसे, बबलुभाऊ अडाणी, गिरधर मुसळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्‍टीमुळे पिकांचे झालेले नुकसान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT