Washim Farmer Destroys Banana Crop Due to Drought File Photo
वाशिम

Washim News: दुष्काळाच्या झळांनी हताश शेतकऱ्याने उभ्या केळीच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर

वाशिम जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्यावर तर अखेर उभ्या केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Washim Farmer Banana Crop Loss

वाशीम : जिल्ह्यात दुष्काळ, पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा फटका शेतकऱ्यांच्या फळबागांना बसत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्यावर तर अखेर उभ्या केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे.

ढिल्ली येथील शेतकरी उमेश मारकड यांनी अडीच एकर क्षेत्रात तब्बल तीन हजार केळीच्या झाडांची लागवड केली होती. वर्षभर कष्ट घेत आणि योग्य नियोजन करत त्यांनी केळीची बाग फुलवली होती. पुढील महिन्यात केळीची तोडणी सुरू होणार होती. मात्र, पावसाअभावी विहीर आणि बोअरवेल ऑक्टोबर महिन्यातच कोरडे पडले.

त्यातच वाढत्या तापमानामुळे संपूर्ण केळीची बाग सुकू लागली. बागेतून उत्पादन मिळण्याची कोणतीही शक्यता उरली नसल्याने अखेर उमेश मारकड यांनी हताश होऊन उभ्या केळीच्या बागेत ट्रॅक्टर फिरवला आणि संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली.

या बागेसाठी आतापर्यंत साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च झाला होता; मात्र हाती आलेले उत्पन्न शून्य आहे. वर्षभराची मेहनत आणि लाखो रुपयांचा खर्च मातीमोल झाल्याने हा युवा शेतकरी हतबल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT