Washim Harish Sarda extortion case Pudhari
वाशिम

Harish Sarda Arrest | अखेर खंडणीखोर हरीश सारडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मालेगाव तालुक्यातील जवळूका येथे पाठलाग करून केली अटक

पुढारी वृत्तसेवा

Washim Harish Sarda extortion case

वाशिम: कुख्यात खंडणीखोर म्हणून ओळख असलेल्या हरीश सारडा याच्या मुसक्या अखेर वाशिम शहर पोलिसांनी आवळल्या असून दीर्घकाळ चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तपास अधिकाऱ्यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती.

मात्र, संबंधित आरोपीने पोलिसांना सहकार्य न करता वारंवार टाळाटाळ केली. कधी तब्येतीचे कारण पुढे करून पोलीस स्टेशन व जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला, तर कधी वाढदिवसाचे कारण सांगत तपासापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो गाव सोडून फरार झाला होता.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवत सापळा रचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे अकोला रोडवरील लालमाती हॉटेल परिसरात पोलिसांनी जाळे टाकले होते. मात्र पोलिसांची हालचाल लक्षात येताच आरोपीने वाहन वळवून मालेगावच्या दिशेने पळ काढला.

यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू ठेवला. मालेगाव-नागरतास मार्गे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अखेर मालेगाव तालुक्यातील जवळूका येथे पोलिसांनी धाडसी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

दरम्यान, या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून कुख्यात आरोपीच्या अटकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास वाशीम शहर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT