आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. Pudhari News Network
वाशिम

IAS Officer Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू

पुढारी वृत्तसेवा

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वादग्रस्त परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच बदली झाली. दोन दिवसांनी त्या आज (दि.११) वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. आता वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. त्यांना कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूजा खेडकर यांना स्वतंत्र केबिन मिळण्याची शक्यता कमीच

पूजा खेडकर यांनी पुण्यात स्वतंत्र कार्यालयाची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना स्वतंत्र केबिन मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचे सध्या नुतनीकरण चालू आहे. तर जिल्ह्यात निवासस्थानाची कमतरता असल्याने अधिकाऱ्यांना विश्राम गृहात मुक्काम करावा लागत आहे.

दरम्यान, वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया खेडकर यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT