Washim Congress Protest March
वाशीम : वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या FIR च्या निषेधार्थ भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
ॲड. दिलीपराव सरनाईक, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमित झनक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, तालुका काँग्रेस पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या FIR चा तीव्र निषेध नोंदवत, लोकशाही, संविधान आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला.
मोर्चामध्ये जावेद सौदागर प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी, चंद्रकांत साठे प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी, मधुकर जुमडे एससी सेल प्रदेश कमिटी, किसनराव मस्के उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी , परसराम भोयर सरचिटणीस काँग्रेस कमिटी, दिलीप मोहनावाले तालुका अध्यक्ष मंगरूळपीर, डॉ. श्याम गाभणे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी, गजानन गोटे तालुकाध्यक्ष, सागर गोरे
शहराध्यक्ष, विजयराव देशमुख तालुका अध्यक्ष कारंजा, अब्दुल राजिक शेख शहराध्यक्ष कारंजा, रामेश्वर देवकर तालुका अध्यक्ष रिसोड, ॲड. पी. पी. अंभोरे, वैभव सरनाईक जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, शिवम वाघ अध्यक्ष NSUI, रामनाथ राठोड तालुका अध्यक्ष मानोरा, मनीष भालेराव जिल्हाध्यक्ष एस सी सेल, यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन उज्वल देशमुख यांनी केले, तर प्रा. दादाराव देशमुख व सुरेश रत्नपारखी यांनी आभार मानले.