Washim District Court Verdict | पॉक्सो, अत्याचार प्रकरणात तरुणाची निर्दोष मुक्तता

वाशिम अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; अल्पवयीन असल्याचे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण
Court Verdict
Court VerdictFile Photo
Published on
Updated on

Washim POCSO Case Verdict

वाशिम : पॉक्सो आणि अत्याचाराच्या आरोपाखाली दाखल झालेल्या प्रकरणात वाशिम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २२ वर्षीय तरुणाची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. सहस्रबुद्धे यांच्या न्यायालयाने २४ ऑगस्ट रोजी हा निकाल दिला.

या प्रकरणात गोहागाव हाडे (ता. रिसोड, जि. वाशिम) येथील रहिवासी निलेश उर्फ बंटी शांताराम वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणातील माहितीनुसार, २१ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास संबंधित मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मुलगी सापडल्यानंतर तिच्या पूरक जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली होती.

Court Verdict
Washim Crime | मानोरा पंचायत समितीत ग्राम रोजगार सेवकाला चपलेने मारहाण

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने बाजू मांडली, तर आरोपीच्या वतीने ॲड. एम. डी. इंगोले यांनी युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, कथित घटना घडली. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध करणारा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अन्य ठोस पुरावा सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आला नाही.

तसेच, पीडितेचा सुरुवातीचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि न्यायालयात नोंदविण्यात आलेली साक्ष यामध्ये विसंगती व विरोधाभास असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद तसेच उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाला पीडितेचे वय अल्पवयीन असल्याचे तसेच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार झाल्याचे पुराव्यांद्वारे सिद्ध करता आले नसल्याचे नमूद केले.

केवळ संशय किंवा अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरविता येत नाही, या कायदेशीर तत्त्वाचा विचार करून न्यायालयाने निलेश उर्फ बंटी शांताराम वाघमारे याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news