वाशिम

वाशीम : शेतकऱ्याने पाच एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी

मोहन कारंडे

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या वाशिममधील मानोरा तालुक्यातील विठोली येथील विष्णू भोयर (पाटील) या शेतकऱ्याने ५ एकर संत्रा बागेवर जेसीबी फिरवला.

संत्र्याला सध्या १०० रुपये कॅरेट असा भाव मिळतो. पूर्वी चांगला भाव असल्याने विष्णू भोयर यांनी ५ एकर शेतीत संत्रा लागवड केली होती. परंतु भाव पडल्याने व लागवडीचा खर्च निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने पाच एकर शेतातील संत्रा बागेवर जेसीबी चालवत बाग उद्ध्वस्त केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT