वाशिम; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सावरगाव कान्होबा या मंगरूळपीर तालुक्याचे मूळ निवासी आणि जिल्ह्यात गटविकास अधिकारी म्हणून सेवा बजावलेले उत्तमराव सवाईराम चव्हाण यांचे सुपुत्र स्वच्छंद चव्हाण यांची नेमणूक केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील सह आयुक्त या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.
२०१४ च्या आय आर एस तुकडीचे असलेले स्वछंद चव्हाण यांच्याकडे आता भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आखत्यारीतील कस्टम,जीएसटी आणि नार्कोटिक्स विभागाचे सह आयुक्त म्हणून पदभार देण्यात आलेला आहे. चव्हाण हे सध्या भारत सरकारच्या गृह खात्याकडे प्रतिनियुक्तीवर असून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) मध्ये दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवीत आहेत. प्रारंभी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात जीएसटी आणि मध्य प्रदेशामध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मधेही त्यांनी यशस्वी सेवा बजावलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील स्वच्छंद चव्हाण आणि समीर वानखडे हे इंडियन रेवेन्यू सर्विस द्वारा निवड झालेले देशाच्या महत्त्वाच्या विभागात कार्यरत अधिकारी आहेत.
हेही वाचा :