Kirit Somaiya visit Washim Maharashtra Loudspeaker Ban
वाशिम : एका महिन्यात मुंबई, तर तीन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होईल, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (दि.२३) पत्रकार परिषदेत सांगितले. ते आज वाशिम दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली.
त्यांनतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईत आतापर्यंत ६० टक्के बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले आहेत. एका महिन्यात मुंबई, तर तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगे मुक्त होईल. दरम्यान, तालुक्यात ३ हजार ३२० जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने नायब तहसीलदारांनी दिले आहेत. ते परत घेतले जाणार आहेत.
त्याबरोबर जिल्ह्यातील बाकी तहसीलदारांनी दिलेल्या प्रमाणपत्राची देखील चौकशी करण्यात येणार आहे. राज्यात आणि देशात विरोधी पक्षातील नेत्यांचे भोंगे ४ महिने सतत वाजत आहेत. त्यांचे भोंगे वाजू द्या, पण राज्यातील मशिदींवरील बेकायदेशीर एकही भोंगा वाजू देणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी यावेळी दिला.