चोरट्यांनी घरातील पलंग अस्ताव्यस्त करून टाकला  (Pudhari Photo)
वाशिम

Washim Theft News | करंजा शहरात चोरीचे सत्र कायम: घराचा दरवाजा तोडून ७० हजारांची रोकड लंपास

Karanja Burglary | १५ सदस्य हज यात्रेसाठी गेले असता चोरट्यांनी साधली संधी

पुढारी वृत्तसेवा

Karanja house door broken theft

वाशिम: कारंजा शहरात आज (दि.13) पहाटे ५ वाजता बंद घरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कारंजा शहरातील नागरिक चिंतेत आहेत.

करंजा शहरातील हसमणी परिसरात असलेल्या एका घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपये रोख रक्कम चोरली. ज्या घरात चोरी झाली त्या घरातील १५ सदस्य हज यात्रेसाठी गेले होते. हे कुटुंब आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी परतले होते. जेव्हा त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि आत गेले, तेव्हा सर्वजण स्तब्ध झाले. घरात ठेवलेला मोठा पलंग अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. पलंगाच्या शेजारी ठेवलेल्या लोखंडी कपाटाच्या तिजोरीची स्थिती पाहता घरात चोरी झाल्याचे समजले. कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये चोरट्यांनी पळवून नेले.

घराच्या मुख्य दरवाजात सीसीटीव्ही कॅमेरा बसवला असला तरी, चोर हुशार निघाले. त्यांनी मागून घराच्या वरच्या भागात पोहोचण्यासाठी बाजूच्या लोखंडी पिंजऱ्याचा वापर केला आणि गॅलरीतील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. हसमानी कुटुंबाच्या प्रमुखाने पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.

दोन दिवसांपूर्वी याच कॉम्प्लेक्समधील मेमन कॉलनी परिसरातील एका शिक्षक दाम्पत्याच्या घरी सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न शेजारच्या एका महिलेच्या ओरडण्यामुळे अयशस्वी झाला. मेमन कॉलनीतील घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे परिसरात गस्त घालण्याची मागणी केली होती. आता या चोरीच्या घटनेमुळे कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT