Election Commission Guidelines ID Proofs
वाशिम: नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र (व्होटर आयडी) व्यतिरिक्त १२ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य धरली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांना ओळख पटविण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि ते सहज मतदानाचा हक्क बजावू शकतील.
मतदान केंद्रावर मतदारांची ओळख मतदान अधिकाऱ्याने खातरजमा करणे बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. १४ जुलै २०२५ रोजीच्या आदेशान्वये खालील १२ कागदपत्रांचा ओळखपुरावा म्हणून वापर करता येणार आहेत.
१. भारताचा पासपोर्ट
२. आधार ओळखपत्र
३. वाहन चालविण्याचा परवाना (Driving License)
४. पॅन कार्ड – आयकर विभागाकडील ओळखपत्र
५. केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिलेले कर्मचारी ओळखपत्र (फोटोसहित)
६. राष्ट्रीयकृत बँक / पोस्ट ऑफिस खातेदाराचे फोटो असलेले पासबुक
७. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
८. मनरेगा (नरेगा) जॉब कार्ड – फोटोसहित
९. निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्ती यांचे फोटो असलेले पेंशन संबंधित कागदपत्रे
१०. लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधानपरिषद सदस्य ओळखपत्र
११. स्वातंत्र्य सैनिकांचे फोटोसहित ओळखपत्र
१२. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले ईएसआय (आरोग्य विमा) फोटोसहित कार्ड
मतदानाच्या दिवशी अधिकृत ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवावे.
अनधिकृत चिठ्ठी, ओळखपत्राची साधी झेरॉक्स किंवा ओळख नसलेली कागदपत्रे मान्य केली जाणार नाहीत.
मतदानादरम्यान ओळख संबंधी तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदानाचा हक्क बजावताना आवश्यक ओळखपत्र अवश्य सोबत आणावे.