Bribe Case Pudhari
वाशिम

Washim Bribe | मंगरूळपीर पोलीस ठाण्यात २ हजारांच्या लाचेचा प्रकार; पोलीस कर्मचारी फरार, खासगी व्यक्ती 'एसीबी'च्या ताब्यात

दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठविण्यासाठी झेरॉक्स काढण्याच्या नावाखाली दोन हजार रुपयांची लाच मागितली

पुढारी वृत्तसेवा

Mangrulpir Police Station ACB Trap

वाशिम : मंगरूळपीर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठविण्यासाठी झेरॉक्स काढण्याच्या नावाखाली दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. या प्रकरणात पोलीस हवालदार सुनील टाले आणि खासगी व्यक्ती विजय चंदू चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस कर्मचारी सुनील टाले हा फरार झाला आहे.

मंगरूळपीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाठविण्यासाठी झेरॉक्स काढण्याच्या कारणावरून तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान खासगी व्यक्ती विजय चंदू चव्हाण याने पोलीस हवालदार सुनील टाले याच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे आढळून आले.

यानंतर एसीबीच्या पथकाने सुनील टाले याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पथकाला विरोध करून चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने पळ काढला. त्यामुळे तो फरार झाला असून, एसीबीकडून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सुनील टाले आणि विजय चंदू चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय चव्हाण याला एसीबीने ताब्यात घेतले असून, फरार पोलीस कर्मचारी सुनील टाले याचा शोध घेण्यासाठी पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. या कारवाईमुळे मंगरूळपीर पोलीस ठाण्यासह संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT