शेलुबाजार येथील सागर प्रधान याचा मृतदेह अडाण नदीत सापडला.  Pudhari News Network
वाशिम

स्टंटबाजी करताना वाहून गेलेल्या शेलुबाजार येथील तरुणाचा मृतदेह सापडला

पुढारी वृत्तसेवा

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील सागर (गोलु) अरूण प्रधान (वय ३०) या तरुणाचा अडाण नदीच्या पुलावरून उडी मारत स्टंटबाजी केल्याने मृत्यू झाला होता. मागील दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर आज (दि. ४) दुपारी एकच्या सुमारास त्याचा मृतदेह घटनास्थळापासून १ किलोमीटर अंतरावर शोध पथकाला सापडला.

जिल्हाधिकारी भुवनेश्वरी. एस तसेच निवासी जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या आदेशाने शोध मोहीम सुरू होती. मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, जीवरक्षक यांना पाचारण केले होते. सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, अंकुश सदाफळे, विष्णु केवट, शेखर केवट, अश्विन केवट, महेश वानखडे, अतुल उमाळे, गोपाल गीरे, अपूर्व चेके, शुभम भोपळे, दत्ता मानेकर, राम भोपळे, सागर डाके, रोशन झामरे, ओम गोरवे, मयुर कळसकार, धीरज राऊत, सुरज ठाकुर, निलेश खंडारे, विकास सदाशिव, निखील बोबडे, गोलु वाळके, ओम वानखडे, अमर ठाकूर यांनी शोधमोहिमेत सहभाग घेतला.

यावेळी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शितल बंडगर, नायब तहसीलदार रवी राठोड, शाहू भगत, तलाठी टी. एन. गावंडे, तलाठी दिनेश राऊत, तलाठी एन. पी. पांडे आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT